ज्यांनी गोळीबार केला ते…, सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून सरवणकरांवर कुणी साधला निशाणा?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 'ज्यांनी गोळीबार केला त्यांना सिध्दीविनायक ट्रस्टवर बसवलं आहे.सिद्धीविनायक ट्रस्टवर दुसरे जनरल डायर बसवलं आहे.', असा घणाघातही केला.
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ | मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आदेश बांदेकर यांच्याकडे होती. यावरून आता ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येतोय. ‘ज्यांनी गोळीबार केला त्यांना सिध्दीविनायक ट्रस्टवर बसवलं आहे.’, असे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तर सिद्धीविनायक ट्रस्टवर दुसरे जनरल डायर बसवले, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या नियुक्तीवरून आदित्य ठाकरे यांनी हा जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यात ज्यांनी भाविकांवर बंदूक रोखली. पोलिस स्थानकात जाऊन फायरिंग केलं. त्यांच्यावर आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशा जनरल डायरला सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली.