‘हू इज बाळासाहेब? असंही विचारलं जाईल’, आदित्य ठाकरे यांचा कुणावर घणाघात

| Updated on: Apr 13, 2023 | 9:35 PM

VIDEO | काही दिवसांनी हू इज बाळासाहेब असंही विचारतील, आदित्य ठाकरे यांच्या भाजपच्या या बड्या नेत्यावर हल्लाबोल

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य केलं. यानंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे कसबा पेठ पोटनिवडणुकीत हू इज धंगेकर असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. हू इज धंगेकर विचारणारे परवा विचारतात हू इज शिवसेना कदाचित ते हू इज बाळासाहेब ठाकरे असेही विचारू शकतील, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. तर एका निवडणुकीत उत्तर मिळालेलं आहे, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल जे वक्तव्य केल्यानंतर देश त्यांना निवडणुकीत उत्तर देतील, असा विश्वास व्यक्त केला. आदित्य ठाकरे पुढे असेही म्हणाले, हे सर्व त्या पक्षाचं प्लॅनिंग आहे एखादा खडा टाकून बघावं किती लोक सहमत आहेत काय नक्की प्रतिक्रिया मिळते. आम्हाला त्यांच्याकडून माफी नाहीतर काही स्पष्टीकरण अपेक्षित होतं.

Published on: Apr 13, 2023 09:34 PM
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईच्या ‘या’ नव्या मिशनबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी दिली मोठी माहिती
विधवा महिलांसाठी गंगा भागीरथी हा शब्द न घेता पूर्नांगिनी शब्द घ्यावा, कुणी केली शिफारस?