गद्दारांच्या सभेला जनतेपेक्षा खुर्च्यांची गर्दी, शिंदे गटावर कुणी केली बोचरी टीका?
VIDEO | महाविकास आघाडीच्या सभेला जनतेची गर्दी जास्त तर गद्दारांच्या सभेला...., काय म्हणाले आदित्य ठाकरे?
पुणे : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीची प्रचार सभा होतेय. यावेळी ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सभेला जनतेची गर्दी जास्त असते तर गद्दारांच्या सभेला जनतेपेक्षा खुर्च्यांची गर्दी जास्त असते. शिंदे गटाने खुर्च्यांसाठी गद्दारी केली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला जनतेची नाही तर गच्च खुर्च्यांची गर्दी असते. तसेच गद्दार शिंदे गटामागे भाजपची महाशक्ति आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. पुण्यातील चिंचवड येथे नाना काटे यांच्या प्रचार सभेत बोलत असताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर हा हल्लाबोल केला. तर या प्रचारसभेत आदित्य ठाकरे बोलायला उभे राहिले तेव्हा अचानकपणे 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे लवकरच कोसळणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.