Special Report | महापालिका निवडणुकांआधी आदित्य ठाकरे मैदानात
महानगरपालिका , जिल्हा परिषदेच्या निवडणूका अजून जाहीर झाल्या नाहीत, लवकरच त्या जाहीर होतील. पण येत्या काळातही एकत्र लढावं असे आम्हाला वाटत, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरें यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधताना व्यक्त केले आहे.
पुणे – जे काही असत ते शिवसेनेच खुलं असतं. गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार एकत्रितपणे चांगलं काम करत आहेत. महानगरपालिका , जिल्हा परिषदेच्या निवडणूका अजून जाहीर झाल्या नाहीत, लवकरच त्या जाहीर होतील. पण येत्या काळातही एकत्र लढावं असे आम्हाला वाटत, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरें यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांसोबत संवाद साधताना व्यक्त केले आहे.
विकास काम कुठेही थांबलेली नाहीत.
कोरोनामुळे बरेच दिवस कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटता आले नव्हते. कोरोना नियमावलीचे पालन करत असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेणे शक्य नव्हते. कोरोनाच्या केस कमी झाल्यानंतर आणि पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याच्या आगोदर पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. कारण कोरोना काळात पदाधिकाऱ्यांनी अंत्यत चांगले काम केले आहे. त्याच्या काही संकल्पना ऐकण्यासाठी ही बैठा घेण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली . महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. कोरोनाच्या आधीचा काळ असेल किंवा कोरोना काळात विकास काम कुठेही थांबलेली नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री सर्वचजण चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले.