Aaditya Thackeray : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र अन् केली ‘ही’ मोठी मागणी

| Updated on: Dec 09, 2024 | 5:53 PM

बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चर्चेचा विषय ठरतोय. अशातच बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले आहे. त्यामध्ये बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे. या पत्रात आदित्य ठाकरे यांनी असे म्हटले की, ‘सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल आपले अभिनंदन करतो. आजच सभागृहामध्ये प्रथेप्रमाणे आपला परिचय झालेला आहे. त्याबद्दल सर्व सदस्यांनी आपले अभिनंदन ही केलेले आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेळगाव आणि कारवारचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नी मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे हे आपण जाणताच. बेळगाव कारवार प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. आपणास कळकळीची विनंती आहे की बेळगाव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याय द्यावा. आपण सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगांव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा आम्ही एक मताने या ठरावास पाठिंबा देऊ. बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती’, असे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 09, 2024 05:53 PM
Bigg Boss Fame Suraj Chavan : सूरज चव्हाण यानं घेतली अजित पवार यांची भेट, भेटीनंतर एकच म्हणाला, ‘दादा तर…’
Kurla Accident : कुर्ला बस अपघाताने मुंबई हादरली, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार