देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा आम्ही त्यांना मिठी मारली तेव्हा…
VIDEO | पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटनंतर आदित्य ठाकरे यांनी नेमकी काय मांडली भूमिका?
मुंबई : महाराष्ट्राचा महासंकल्प या ‘टीव्ही 9 मराठी’च्या विशेष कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवर मोठे गौप्यस्फोट केले. पहाटेच्या शपथविधीवर मोठे गौप्यस्फोट केले त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “मी एवढंच बघितलं, ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्या मिनिटापासून शरद पवार, अजित पवार, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल ते उद्धव ठाकरे यांच्यामागे भक्कमपणे उभे आहेत. “ज्यांना आम्ही आपलं मानलं, ज्यांना आम्ही सगळं दिलं, त्यांच्यासाठी दिवस-रात्र मेहनत केली, त्यांच्यासाठी सगळे वार अंगावर घेतले त्याच लोकांनी जेव्हा आम्ही त्यांना मिठी मारली तेव्हा त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पण जे आमचे नवे मित्रपक्ष झाले ते अजूनही आमच्यासोबत आहेत. आता समजायचं काय? हे तुम्ही विश्लेषण करा”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.