वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा जंगी कार्यक्रम! 18 ठिकाणी भूमिपूजन आणि लोकार्पण

| Updated on: Jan 23, 2022 | 5:28 PM

पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख मैदानात उतरले असून, वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी आज विविध ठिकाणच्या कामाचे उदघाटन केलंय.

आदित्य ठाकरेंनी आपल्या वरळी मतदारसंघात तब्बल 18 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलंय. आदित्य ठाकरेंच्या हस्ते नरिमन भट जेट्टींचं उद्घाटन करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनाचं औचित्य साधून आदित्य ठाकरे आपला मतदारसंघ पिंजून काढताना दिसून आलेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख मैदानात उतरले असून, वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी आज विविध ठिकाणच्या कामाचे उदघाटन केलंय. स्थानिक आमदार म्हणून मी केलेल्या कामाचे उदघाटन करत आहे, असं त्यांनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे मला आणि शिवसेनेला कोणतीच भीती वाटत नाही, असंही यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलंय. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला याम्ही फार महत्व देत नाही त्याकडे पाहत देखील नाही, तसंच भाजप आणि मनसेला टीका करण्या शिवाय कोणता उद्योग नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Published on: Jan 23, 2022 05:27 PM
महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला MIMचा विरोध का? शिवसेना खासदार संजय राऊतांचा सवाल
Rohit Patil | रोहित पाटलांकडे राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं जाणार? जयंत पाटील म्हणाले की…