आदित्य ठाकरेंना धमकी, गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत – मलिक

| Updated on: Dec 23, 2021 | 12:36 PM

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली आहे. दरम्यान आता या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबई :  पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरूमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती. दरम्यान आता या प्रकरणात गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

Winter Session | पेपरफुटी, OBC आरक्षण, शेतकरी मदतीवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
VIDEO : Yavatmal | यवतमाळमधील तरुणाचं मोदींना लग्नाचं निमंत्रण, मोदींनी दिल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद