रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी भरतीचे पाणी

| Updated on: Mar 29, 2022 | 10:23 PM

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर होते त्यांच्या कोकण दौऱ्यादरम्यान त्यांनी आज (मंगळवारी) गुहागरच्या वेळणेश्वर इथल्या समुद्र किनारपट्टीवर सभा घेतली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर होते त्यांच्या कोकण दौऱ्यादरम्यान त्यांनी आज (मंगळवारी) गुहागरच्या वेळणेश्वर इथल्या समुद्र किनारपट्टीवर सभा घेतली. यावेळी आदित्य ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी अनेकजण आले होते. दरम्यान, याच सभेदरम्यान, वेळणेश्वर समुद्राला उधाण आलं होते. यावेळी आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाच्या आजूबाजूलाही भरतीचं पाणी येण्यास सुरुवात झाली होती. सुदैवानं याचा सभेला काही फटका बसला नाही. मात्र हळूहळू भरतीचं पाणी वाढू लागल्यानंतर अनेकांची तारांबळ उडाली होती. अनेक गाड्या भरतीच्या पाण्यात अडकून राहिल्या होत्या. सभेच्या ठिकाणी भरतीचं पाणी घुसल्यामुळे कार्यकर्त्यांचीही पळापळ झाल्याचे यावेळी पाहायला मिळालं.

शिवसेना, संजय राऊत यांना मौन धारण करावं लागणार
कोकणातील विकास हा श्वाश्वत विकास पाहिजे