Gunaratna Sadavarte Video : बीड प्रकरणावरून गुणरत्न सदावर्तेंचा सुरेश धस यांच्यावर घणाघात, ‘हवालदार म्हणून काम…’
वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘बीड हत्या प्रकरणात सुरेश धस हवालदार म्हणून काम करतात’, असं सदावर्ते म्हणालेत. ‘बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते बीड प्रकरणात स्टेअरिंग हातात घेतल्यासारखं वर्तन करत आहेत. जसं पोलीस हवालदार कामं करतात आणि माहिती शोधून आणत असतात तसंच आमदार सुरेश धस एकेक माहिती शोधून काढताय ‘, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी सुरेश धसांवर निशाणा साधला आहे. तर वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. ‘सुरेश धस यांचं एका विशिष्ट जात समुहासंबंधित जे काही चाललेलं आहे, त्यांचं बोलणं, चालणं यामुळे वंजारी समाज विक्टीम होत आहे. ही जर वस्तुस्थिती असेल तर तपासातील अधिकाऱ्यांनी स्वतःहून यापासून वेगळं राहायला काही हरकत नाही’, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.