अपात्रतेच्या निकालानंतर उज्वल निकम यांनी ठाकरेंना दाखवली आशा, काय केलं भाष्य?
'निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा अध्यक्षांनी आधार घेतला आहे. अध्यक्षांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून हा वेगळा निकाल असल्याचे उज्वल निकम यांनी म्हटलं. तर यापुढे राजकीय पक्षांना आपली घटना लिहिताना बरीच खबरदारी घ्यावी लागेल.' उज्वल निकम यांची निकालावर प्रतिक्रिया
बीड, ११ जानेवारी २०२४ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा अखेर निकाल दिला. यावर जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी भाष्य केले आहे. आजचा हा निकाल कुठं गम आणि कुठं खुशी असा आहे. दोघांचेही अपात्र करण्यासाठी एकमेकांविरुद्ध आरोप होते, . मात्र अध्यक्षांनी दोघाही गटांना अपात्र केले आहे. ही घटना सुखावणारी आहे. अध्यक्षांनी राजकीय पक्ष फुटला याबद्दल विस्तृत विवेचन केलेलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा अध्यक्षांनी आधार घेतला आहे. अध्यक्षांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून हा वेगळा निकाल असल्याचे उज्वल निकम यांनी म्हटलं. तर यापुढे राजकीय पक्षांना आपली घटना लिहिताना बरीच खबरदारी घ्यावी लागेल. राजकीय पक्षाच्या घटना पुन्हा तपासून घ्यावा लागतील. आमदारांच्या अपात्रतेबद्दल अध्यक्षांनी परिषष्ट 10 ची सांगड घातली आहे. या निकालाचे दूर्गामी परिणाम होतील, अशी शक्यताही वर्तविली.