सत्तासंघर्षाच्या सुनावणीत व्हीपचा मुद्दा ऐरणीवर? बघा काय म्हणताय कायदेतज्ज्ञ उज्वल निकम

| Updated on: Feb 27, 2023 | 8:37 PM

VIDEO | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या उद्या होणाऱ्या सुनावणीत व्हीपचा मुद्दा ऐरणीवर? काय म्हणाले कायदेतज्ज्ञ उज्वल निकम, बघा व्हिडीओ

अकोला : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान, शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात सांगितलं की ते पक्षाचं व्हीप बजावणार नाही आणि 2 आठवडे अधिवेशनाच्या संदर्भात कोणावरही अपात्रतेची कारवाई करणार नाही, अशी हमी त्यांनी सुप्रीम कोर्टाला दिली. या हमीनुसार कोणी वागत नसेल तर सुप्रीम कोर्ट यावर गांभिर्याने विचार करू शकते. इतकेच नाही तर मग हा न्यायालयाचा अवमान ही होऊ शकतो, अर्थात या करता ही प्रामाणिक चूक असेल तर त्याप्रमाणे त्यांना माफी ही मिळू शकते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या उद्याच्या या सुनावणीत हा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Published on: Feb 27, 2023 08:29 PM
आमदार बच्चू कडू यांच्या अडचणी वाढवणार? कलम 506 अंतर्गत दोषी, बघा काय आहे प्रकरण?
तेव्हा क्लिप नव्हत्या का? किशोरी पेडणेकर यांचा नारायण राणे यांना खोचक सवाल, बघा काय म्हणाल्या?