आता तलाठी अन् तहशीलदार सुद्धा कंत्राटी? ‘त्या’ जाहिरातीवरून नवा वाद

| Updated on: Oct 01, 2023 | 9:02 AM

tv9 Special Report | जळगावमध्ये तलाठी आणि तहशीलदार पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असल्याची जाहिरात व्हायरल झाली आहे. कंत्राटी भरतीच्या जाहिरातीवरून पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर भरतीच्या जाहिरातीत कोणतंही तथ्य नसल्याचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जळगाव, १ ऑक्टोबर २०२३ | जळगावमध्ये तलाठी आणि तहशीलदार पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असल्याची जाहिरात व्हायरल झाली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यावरून आमने-सामने आले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसताय. तर अतिरिक्त मनुष्यबळासाठी ही अतिरिक्त भरती कंत्राटी पद्धतीची असल्याची अफवा आहे, असे जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या व्हायरल जाहिरातीमध्ये तहसीलदार, नायब तहशीलदार, कारकून यासह इतर काही पदं कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. यावरून विरोधक आक्रमक झालेत तर सरकार म्हणतय ही तात्पुरत्या स्वरूपातील भरती आहे. यावरून सरकार सरकारी नोकऱ्यांमार्फत खासगीकरणाचं पाऊल टाकत असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. दरम्यान या कंत्राटी भरतीच्या जाहिरातीत कोणतंही तथ्य नसल्याचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 01, 2023 09:02 AM
Mumbai Toll | टोल महाग! ‘या’ 5 ठिकाणी आकारले जाणार अधिकचे पैसे, दरात नेमकी किती वाढ?
आरक्षणावरुन अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार आमने-सामने, बघा काय केले अरोप?