येणाऱ्या काळात जरांगे की नही चलेगी…, गुणरत्न सदावर्ते यांनी काय केली सडकून टीका?
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील की नही चलेगी... असं म्हणत सामाजिक सलोखा फक्त मनोज जरांगे बिघडवत आहे. दुसरा कोणी बिघडवत नाही, असा थेट आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
सध्या राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण पेटलं आहे. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील की नही चलेगी… असं म्हणत सामाजिक सलोखा फक्त मनोज जरांगे बिघडवत आहे. दुसरा कोणी बिघडवत नाही, असा थेट आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इंव्हॉल्युवेशन ऑफ कास्ट काय आहे? हे मनोज जरांगे पाटील यांना माहिती नाही. आम्ही संविधानाच्या भाषेत लढाई करतो आणि तुम्ही अत्याचाराची ताकद वापरून बोलत आहात. त्यामुळे या राज्यात संविधान समजत नसेल तर आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिलं जाणार नाही, अशी टीका देखील गुणरत्न सदावर्ते यांनी लावला आहे.
Published on: Jun 25, 2024 05:35 PM