MSRTC Employees Strike : ‘तेव्हा लाज नाही वाटली’, एसटी आंदोलनावर बोलताना गुणरत्न सदावर्तेंचा कुणावर हल्लाबोल?
निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना आगीत ढकलत आहेत, असे म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीकास्त्र डागलं. तर १२४ कर्मचाऱ्यांचा आत्महत्या झाल्यात तेव्हा महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना लाज वाटली नाही, असे म्हणत सडकून टीका केली. बघा नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे. आज या संपाचा दुसरा दिवस असून एसटीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मविआ नेत्यांसंदर्भात वक्तव्य केले आहे. संपाचे जे पुरस्कर्ते आहेत, मविआचे जे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आहेत, त्यांना माझा सवाल आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी निशाणा साधला ते म्हणाले, उच्च न्यायालयाने जेव्हा संपाला नकार दिला, कोणताही बंद असा करता येत नाही तेव्हा तुम्ही संपाचं बोऱ्या बिस्तार घेऊन बाजूला झालात आणि सर्वात प्रथम सांगितलं आम्ही संप करणार नाही, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मविआ नेते आणि शरद पवार यांच्यावर घणाघात केला आहे. पुढे असेही म्हणाले की, जर औद्योगिक न्यायालयाने संप करता येत नाही, असे सांगितले असताना माझ्या कष्टकऱ्यांना आणि श्वास असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना निवडणुका तोंडावर असताना आगीत ढकलत आहात, असा हल्लाबोल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यावर केला.