Sharad Pawar महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री? गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल

Sharad Pawar महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री? गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल

| Updated on: Jan 10, 2022 | 7:27 PM

एसटी पूर्ववत झाल्यास मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासनही दिलं आहे. मात्र, पवारांच्या या आवाहनानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पवार आणि परब यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील असा इशाराच सदावर्ते यांनी दिलाय.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांचं आवाहन, पगारवाढ, कारवाईचा इशारा, बडतर्फीची कारवाई, कामावर रुजू होण्याची विनंती, अशा सर्व बाबींनंतरही राज्यातील हजारो एसटी कर्मचारी (ST Empolyee) आजही संपावर कायम आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांकडून या संपाला दुखवटा असं नाव देण्यात आलं आहे. मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरु असलेल्या या संपाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं, तसंच एसटी पूर्ववत झाल्यास मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासनही दिलं आहे. मात्र, पवारांच्या या आवाहनानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पवार आणि परब यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील असा इशाराच सदावर्ते यांनी दिलाय.

‘गुजरले ते गुजरले’; Ajay Gujar यांच्यावर Gunaratna Sadavarte यांची मोजक्या शब्दात टीका
Rajesh Tope Live | तिसरी लाट सुरु झालीये, कोरोना निर्बंधाबाबत नागरिकांनी सहकार्य करावं: राजेश टोपे