Nilesh Rane : निलेश राणे यांची नाराजी दूर, देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्ती अन् घेतली माघार

| Updated on: Oct 25, 2023 | 4:35 PM

VIDEO | निलेश राणे यांनी काल तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी काल तडकाफडकी राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर आज सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली आहे. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यासंदर्भातील माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली असून सिंधुदुर्गात निलेश राणे यांच्या नेतृत्वात पक्षाचा झंझावात कायम राहील, असे म्हटले आहे. तर आज देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांना सागर बंगल्यावर बोलावले आणि त्यांची समजून काढून त्यांना पुन्हा पक्षात सक्रीय होण्यास सांगितले.

Published on: Oct 25, 2023 04:35 PM
Manoj Jarange Patil : … तुमच्याकडून ते पण होत नाही आरक्षण काय देणार? गिरीश महाजन यांचा जरांगे पाटील यांना फोन; काय झाली चर्चा?
भाजपनं राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारावर ‘रावण प्रेमी’ म्हणत केली सडकून टीका