Mumbai School Reopen | दीड वर्षानंतर मुंबईतील शाळा सुरु, विद्यार्थ्यांचं औक्षणाने स्वागत
मुंबईतील शाळांचे (Mumbai School) मराठी माध्यमांचे पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून सुरु होत आहेत. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश मंगळवारी पुन्हा एकदा जारी केले आहेत.
मुंबईतील शाळांचे (Mumbai School) मराठी माध्यमांचे पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून सुरु होत आहेत. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश मंगळवारी पुन्हा एकदा जारी केले आहेत. राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आटोक्यात आल्यानंतर 1 डिसेंबरपासून ऑफलाईन शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांची संख्या 3 हजार 420 आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या साडे दहा लाख इतकी आहे. महापालिकेनं आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या वेळी शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले.