फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, सगळ्या आंदोलनाचा खर्चही त्यांनी केला; बारसकरांनंतर एका महिलेचा घणाघात

| Updated on: Feb 22, 2024 | 5:57 PM

मनोज जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी काल जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते त्यानंतर आता मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनीही त्यांच्यावर घणाघात केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी शरद पवार...

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनात फूट पडल्याचे समोर आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी काल जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते त्यानंतर आता मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनीही त्यांच्यावर घणाघात केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी शरद पवार आहेत. इतकंच नाहीतर मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाचा खर्चही शरद पवार यांनी केला असल्याचा गंभीर आरोपही मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनी केला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी महाराष्ट्राला वेडं बनवलं आहे तर मराठा आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना फक्त शरद पवार यांचे फोन यायचे, असे म्हणत संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Published on: Feb 22, 2024 05:57 PM