सरकार कोसळणार? अजित पवार यांच्या चर्चांनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ ट्विटनं खळबळ, नेमका अर्थ काय?
VIDEO | सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' ट्विटनं खळबळ, नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं म्हणत अजित पवार यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात पुम्हा खळबळ उडाली आहे. फडणवीस यांच्या ट्विटमुळे सरकार राहणार की कोसळणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन फोटोंसह हे ट्विट केलं आहे. मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग देऊन त्यांनी हे ट्विट केलं आहे. कार्यालयीन कामकाजातील प्रलंबित कामे मार्गी लावताना असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झाली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावर केव्हाही निकाल येण्याची शक्यता आहे. अशातच फडणवीस यांच्या ट्विटचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचे सांगितल्यानंतर काही तासात फडणवीस यांनी हे ट्विट केलं आहे.