Special Report | समीर वानखेडेंच्या अडचणीत आर्यन आणि अनन्याला फायदा?
आर्यन खान प्रकरणात 25 कोटींच्या डीलचे आरोप झाल्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेच आता अडचणीत आले आहेत. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळण्यास मदत होणार का, याशिवाय अभिनेत्री अनन्या पांडे हिची चौकशी थांबणार का, अशी चर्चा आहे.
आर्यन खान प्रकरणात 25 कोटींच्या डीलचे आरोप झाल्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेच आता अडचणीत आले आहेत. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळण्यास मदत होणार का, याशिवाय अभिनेत्री अनन्या पांडे हिची चौकशी थांबणार का, अशी चर्चा आहे. आर्यन खान आणि अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील दोन मोठी नावे आहेत. समीर वानखेडे यांनी स्वत: त्यांची चौकशी केली. पण आता 25 कोटी डीलच्या आरोपांमुळे समीर वानखेडेंची चौकशी सुरु झालीय. त्यामुळे आर्यनचं प्रकरण बाजूलाच राहिलं आणि समीर वानखेडे अडचणीत सापडले. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 25, 2021 09:41 PM