अशोक चव्हाण भाजपात अन् सोशल मीडियात धुमाकूळ, विश्वासूपासून डीलर ते लीडरपर्यंत टीका

| Updated on: Feb 14, 2024 | 11:06 AM

अशोक चव्हाणांनी भाजपचं उपरणं गळ्यात टाकताच सोशल मीडियावर जुन्या आठवणींचा पूर आला. सर्वात जास्त व्हायरल झाली ती म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासंदर्भातील देवेंद्र फडणवीस यांची आधीची आणि भाजप प्रवेशानंतरची भूमिका...

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४ : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आपला विश्वासूपासून डीलर ते लीडरपर्यंत झालेली टीका सुद्धा व्हायरल होतेय. अशोक चव्हाणांनी भाजपचं उपरणं गळ्यात टाकताच सोशल मीडियावर जुन्या आठवणींचा पूर आला. सर्वात जास्त व्हायरल झाली ती म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासंदर्भातील देवेंद्र फडणवीस यांची आधीची आणि भाजप प्रवेशानंतरची भूमिका…विशेष म्हणजे काँग्रेसने अशोक चव्हाण यांना इतकी पदं देऊनही ते काही करू शकले नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. मात्र अशोक चव्हाण भाजपात आले तेव्हा काँग्रेसला नेते सांभाळता येत नाही, असे म्हणत चव्हाणांच्या प्रवेशाचं कारण पुढे केलं. भ्रष्टाचार आणि इतर नेत्यांबद्दल जेव्हा भाजप नेत्यांना विचारणा झाली तेव्हा त्यांनी उत्तर देणं टाळलं. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Feb 14, 2024 11:06 AM
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अद्याप सुरूच, प्रकृती आणखी खालावली पण उपचारास नकार
नाना पटोले यांचे 1 हजार व्हिडीओ ट्वीट करणार…; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा काय?