मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अयोध्येत दाखल होताच एकनाथ शिंदे म्हणाले…

| Updated on: Apr 08, 2023 | 9:37 PM

VIDEO | अयोध्या दौरा नेमका कशासाठी? पहिल्यांदा अयोध्येत दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खडसावले

अयोध्या : मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अयोध्येत दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी टिव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, ‘दोन दिवसीय आयोध्या दौऱ्यावर असल्याने खूप समाधान आहे. तसेच लखनऊ ते अयोध्येचं मौहोल भगवामय झाला आहे. हजारो कार्यकर्त्यांनी माझे स्वागत केले त्यांचा मी आभारी आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येत पहिल्यांदा येत असून रामाचं दर्शन घेणार आहे.’ तर अयोध्या दौरा हा कोणताही राजनितीक मुद्दा नाही तर श्रद्धा, भक्ती, भावना आणि हा अस्मितेचा विषय आहे. या अयोध्येतून कोणीही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही हा कोणताही राजकीय दौरा नसून श्रद्धा आणि अस्मितेचा विषय असल्याचे एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खडसावून सांगितले आहे.

Published on: Apr 08, 2023 09:37 PM
ये हाथ नहीं हथौड़ा है ! अयोध्येत मुख्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डची चर्चा, वजन अन् उंची ऐकून व्हाल थक्क
मुख्यमंत्र्यांनंतर आता देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्यावर, एकनाथ शिंदेंनी नेमकं काय म्हटलं?