“… म्हणून केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजपवर केला हल्लाबोल
VIDEO | भाजपची सत्ता आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या इशाऱ्यावर चालताय, राष्ट्रवादीच्या नेत्याची थेट टीका
नाशिक : भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर ईडी, सीबीआयसारख्या संस्थांकडून त्यांना अटक करण्याचे काम भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांवर टीका करताना विरोधी पक्षाचे तोंड बंद करण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ते आज येवला दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला. विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त पत्र लिहिले आहे की भाजपचे केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या गैरवापर करत आहे. याबाबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ यांनी सांगितले की, पहिला प्रयोग हा माझ्यावरच करण्यात आला आहे. राजकीय दृष्टीतून जिथे जिथे भाजपच्या विरोधात बोललं जातं.