Saamana : सगळ्यांचेच पाय मातीचे, दुसरे काय म्हणायचे? सामनातून मोदी-शहांवर नेमका घणाघात काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ साठी आधी पक्षातील काटे दूर केलेत असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ३ राज्यांमधील भाजपच्या विजयानंतर सामनातून मोदी शहांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. जुन्या-जाणत्या वाजपेयी-आडवाणीकालीन खांबांना दूर करून तेथे नवे टेकू लावले आहेत, अशी खोचक टीकाही केलीय
मुंबई, १४ डिसेंबर २०२३ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ साठी आधी पक्षातील काटे दूर केलेत असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ३ राज्यांमधील भाजपच्या विजयानंतर सामनातून मोदी शहांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. जुन्या-जाणत्या वाजपेयी-आडवाणीकालीन खांबांना दूर करून तेथे नवे टेकू लावले आहेत, अशी खोचक टीका करत सामनातून लोकसभा निवडणुकीनंतरची ही तयारी असावी. त्याशिवाय दुसरे कोणतेही धोरण दिसत नाही, असा टोला लगावला आहे. तर काँग्रेस हायकमांड दिल्लीतून राज्यात नेमणुका करते हे लोकशाहीला मारक आहे, असे सांगणारे त्याच धोपट मार्गाने जात आहेत. सगळ्यांचेच पाय मातीचे. दुसरे काय म्हणायचे? असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आलाय. पाचपैकी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत मोदी- शहांच्या भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. यावरून ही टीका करण्यात आली आहे.