मंत्री छगन भुजबळ यांना भाजपची ऑफर, मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा काय?
जरांगे म्हणाले, छगन भुजबळ यांना भाजपची ऑफर असेल म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना काही बोलत नाही. जरांगेंनी भुजबळ यांचा संबंध थेट भाजपशी जोडलाय. तर हल्लाबोल करत जरांगेंनी आपला मोर्चा फडणवीस यांच्याकडे वळवत केली टीका
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील संवाद यात्रेची सांगता झाली. मात्र यावेळी सभेतून छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना भाजपची ऑफर आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी करत भाजपवरच गंभीर आरोप केलाय. जरांगे म्हणाले, छगन भुजबळ यांना भाजपची ऑफर असेल म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना काही बोलत नाही. जरांगेंनी भुजबळ यांचा संबंध थेट भाजपशी जोडलाय. तर हल्लाबोल करत जरांगेंनी आपला मोर्चा फडणवीस यांच्याकडे वळवत टीका केली. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस गप्प का? असा सवाल त्यांनी केला होता. तर आता छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ आहे का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. मात्र कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या फडणवीस यांनी भुजबळांना सांभाळून बोलण्याचा इशारा दिलाय. बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?