मुख्यमंत्र्यांनंतर आता देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्यावर, एकनाथ शिंदेंनी नेमकं काय म्हटलं?

| Updated on: Apr 08, 2023 | 9:59 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आयोध्या दौऱ्यावर जाणार?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार असल्याने उद्या म्हणजेच रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजप नेते सुद्धा अयोध्येत दाखल होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, आमच्या राज्यात विकासाची कामे होतील. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये शिवसेना आणि भाजपचे नेते आमदार, खासदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आयोध्येत दाखल होणार आहेत. त्यामुळे आमच्यासाठी हा आयोध्या दौरा श्रद्धा, अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे कुणीही याला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले आहे. लखनऊच्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, लखनऊमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहिला मिळतोय, हा उत्साह पाहून मी त्यांचा आभारी आहे. आयोध्या आमच्यासाठी आस्थेचा विषय असल्याचेही म्हटले आहे.

Published on: Apr 08, 2023 09:58 PM
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा अयोध्येत दाखल होताच एकनाथ शिंदे म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता ‘हा’ पक्षही करणार अयोध्येचा दौरा?