‘माझ्या जीवाला धोका’, बीडमधील मारहाण प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली भिती
VIDEO | 'निश्चितपणे त्याच्या मनात असं काही करण्याचा विचार असू शकतो', सुषमा अंधारे यांनी नेमकं काय म्हटलं?
बीड : बीडमधील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना दोन फटके मारल्याचा दावा केल्यानंतर काही गंभीर आरोपही केले. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यावर सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या, सुषमा अंधारेंवर हात उचलला असं म्हटल्यावर गोंधळ होऊ शकतो. म्हणून आप्पासाहेब जाधव यांनी तसा दावा केला. एखादा माणूस समोर येऊन स्वतःच सांगतो की मी हाच उचलला, याचा अर्थ निश्चितपणे त्यांच्या मनात काही करण्याचा विचार असू शकतो. काल तो माणूस ज्या आवेशात येऊन बोलला त्यावरून निश्चितपणे शिंदे गटाकडून किंवा शिवसेना पुन्हा उभी राहू नये, असे वाटतं त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याची भिती सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. तर तुम्हाला मारहाण झाली का ? असे विचारले असता त्या म्हणाल्या, नाही मला मारहाण झाली असती तर आप्पासाहेब जाधव परत गेले असते का? हे प्रकरण आतापर्यंत थांबलं असतं का? हा दावा करून त्यांना गोंधळ तयार करायचा असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले .