संजय राऊत बाहेर आल्यानंतर सुरक्षारक्षकांवर भडकले
संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. न्यायालयातून बाहेर पडताना यावेळी त्यांची सुरक्षारक्षकासोबत बाचाबाची झाली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले. या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रक्कम मिळाल्याच्या दिशेने आता ईडीने तपासाची दिशा निश्चित केली आहे. त्यामुळे राऊत यांची कोठडी आणखी वाढवून मिळण्याची मागणी आज कोर्टात केली गेली. त्यानुसार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. न्यायालयातून बाहेर पडताना यावेळी त्यांची सुरक्षारक्षकासोबत बाचाबाची झाली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सुरक्षारक्षाकने लगेच त्यांना गाडीमध्ये बसायला सांगितलं, मात्र त्यावरून राऊत त्याच्यावर भडकलेले दिसले.
Published on: Aug 04, 2022 02:20 PM