फडणवीस-ठाकरेंमध्ये रंगला राजकीय सामना, कुणाच्या आव्हानाला कुणाचं प्रतिआव्हान?

| Updated on: Apr 01, 2024 | 10:45 AM

ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो त्यांनी मालवणी भागात जावं, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. तर मालवणीतील जनतेच्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असं म्हणत आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा राजकीय सामना रंगलाय. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावलेल्या टोल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना आव्हान दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर, लडाखमध्ये जावं, त्यांचा संपुर्ण खर्च करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागण्यात आलंय. ठाकरेंच्या पेट्रोलचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूर नव्हे तर मुंबईतील मालवणी येथे जावं, असं आव्हान आशिष शेलारांनी ठाकरेंना दिलंय. दरम्यान, भाजप-मनसे युतीवरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलंय. यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पलटवार करत ते म्हणाले, ‘आता कोण डुबतंय, कोण सहारा घेतंय हे देश बघतोय…’, असे म्हणत खोचक प्रत्युत्तर दिलंय.. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 01, 2024 10:45 AM
ठाकरे गटातील नेत्यांच्या नाराजीनाट्यावर पडदा, अंबादास दानवेंची रूसवे-फुगवे अखेर दूर
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वाद, गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?