देशमुख, मलिकानंतर आता परबांचा नंबर लागणार- किरीट सोमय्या
25 कोटीची प्रॉपर्टी आहे असं ते सांगतात, पण त्यांनी याची माहिती कुठे दिलेली नाही असाही टोला किरीट सोमय्यांनी अनिल परबांना लगावला.
किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावरती जोरदार टीका केली. “सात कोटी रुपये व्हाईटचे वापरले, 25 कोटी ब्लॅक आणि सात कोटी व्हाईट, हे अनिल परबांनी दाखवलेले नाहीत” त्यामुळे अनिल परब यांच्यावरती कारवाई होत आहे. तसेच सदानंद कदम आणि अनिल कदमांच्या सीएनेच याबाबत माहिती दिली आहे. संबंधित दापोलीतील फार्म हाऊसचे इलेक्ट्रीक मीटर अनिल परबांच्या नावे आहे, बिलही तेच भरत आहेत. प्रॉपर्टी टॅक्सही तेच भरत आहेत. 25 कोटीची प्रॉपर्टी आहे असं ते सांगतात, पण त्यांनी याची माहिती कुठे दिलेली नाही असाही टोला किरीट सोमय्यांनी अनिल परबांना लगावला.