राष्ट्रवादी शरद पवार यांच्या हातून निसटली, दिल्लीच्या पक्ष कार्यालयावरील घड्याळ चिन्हाचा ध्वज उतरवला
शरद पवार गटाच्या युवक आघाडीचे नेते धीरज शर्मा यांनी हा ध्वज उतरवल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीवर निर्णय दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नाव, पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी २०२४ : शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील पक्ष कार्यालयावर घड्याळ या पक्ष चिन्हाचा ध्वज उतरवण्यात आला आहे. शरद पवार गटाच्या युवक आघाडीचे नेते धीरज शर्मा यांनी हा ध्वज उतरवल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीवर निर्णय दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नाव, पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर जोरदार निशाणाही साधण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांच्या हातून निसटल्यानंतर त्यांच्या दिल्लीतील पक्ष कार्यालयावरील घड्याळ चिन्हाचा ध्वज उतरवण्यात आलाय. तर आता यापुढे निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या नावाला मान्यता दिल्याने आता नवी ओळख शरद पवार गटाला मिळाली आहे.