सावरकर गौरव यात्रेत मोठ्या संख्येने परभणीकरांसह सावरकर प्रेमींचा सहभाग

| Updated on: Apr 10, 2023 | 5:02 PM

VIDEO | गंगाखेड पाठोपाठ परभणीतही गव्हाणे चौक येथून विद्यानगरपर्यंत भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचं आयोजन

परभणी : गंगाखेड पाठोपाठ परभणीतही भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. शहरातील गव्हाणे चौक येथून विद्यानगरपर्यंत ही यात्रा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तर सावरकर प्रेमींनी या सावरकर गौरव यात्रेत सावरकरांच्या घोषणाही दिल्या. सावरकर गौरव यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकांने होय मी सावरकर अशा टॅगलाईनच्या टोप्या देखील घातल्या होत्या. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यभरात सावरकर गौरव यात्रेला सुरूवात झाली. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्याकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली सर्वात प्रथम मुंबईत दादर, अंधेरी, वांद्रे आणि ठाण्यात ही गौरव यात्रा मोठ्या नागरिकांच्या सहभाग पार पडली. यानंतर राज्यातील प्रत्येक मतदारसंघात ही सावरकर गौरव यात्रा काढण्याचा आदेश भाजपकडून राज्यातील आमदार आणि खासदारांना देण्यात आला.

Published on: Apr 10, 2023 04:19 PM
सपाचे नेते अबू आझमी यांच्या अडचणीत वाढ; 20 एप्रिलला हजर राहण्याचे कोणाचे आदेश?
किरीट सोमय्या यांची सुजित पाटकर यांच्या विरोधात पुण्यात तक्रार, काय आहे प्रकरण?