बॉलीवुडमध्ये कोरोनाची पार्टी, आता करिनानंतर संजय कपूर, सोहेल खानच्या बायकोला कोरोना
दोन सेलिब्रिटीही या विषाणूच्या विळख्यात अडकल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) हिचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबई : बऱ्याच काळानंतर लोक पुन्हा सामान्य जीवन जगू लागले आहेत, पण कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही. अशा परिस्थितीत हा रोग पुन्हा एकदा हातपाय पसरू लागला आहे. सोमवारीच (13 डिसेंबर) करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता त्यांच्यानंतर आणखी दोन सेलिब्रिटीही या विषाणूच्या विळख्यात अडकल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) हिचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यासोबतच सोहेल खानची पत्नी सीमा खानचाही (Seema Khan) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.