खारघर दुर्घटनेनंतर सरकारचा निर्णय, ‘या’ वेळेत मोकळ्या जागेवरील कार्यक्रमास बंदी; काय आहे नवा जीआर?

| Updated on: Apr 19, 2023 | 12:23 PM

VIDEO | खारघर दुर्घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय, नवा जीआर काढल्याची मंगल प्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्काराला उष्माघाताचं गालबोट लागलंय. नवी मुंबईतील खारघरच्या मैदानात या पुरस्कार सोहळ्यात हजर असलेल्या १० हून अधिक श्रीसेवकांना उष्माघातानं आपला जीव गमवावा लागला आहे. या झालेल्या १० हून अधिक जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. अशातच खारघर दुर्घटनेनंतर सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘कल्पनाही करता येणार नाही अशी दुर्दैवी घटना खारघर येथे रविवारी घडली आहे. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये याकरता सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खारघर दुर्घटनेनंतर कोणत्याही मोकळ्या जागेत १२ ते ५ या वेळेत कार्यक्रम घेण्यास बंदी’ असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. तसेच नवा जीआर देखील काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 19, 2023 12:05 PM
मंत्रालयातीलच इंटरनेट सेवा कालपासून ठप्प, सर्व कामं खोळंबली अन्…
फडणवीस म्हणालेले, जलसिंचन घोटाळ्यात अजित पवार चक्की पिसिंग,चक्की पिसिंग! मग पहाटे का केलं किसिंग?- अभिजित बिचुकले