ललित पाटीलनंतर एल्विश यादवरून वादंग, संजय राऊत यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

| Updated on: Nov 05, 2023 | 9:21 AM

ललीत पाटील यांच्या ड्रग्स प्रकरणानंतर आता एल्विश यादववरून राज्यात नवा वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेव्ह पार्टीत सापाचं विष म्हणजे ड्रग्ज पुरवल्याचे आरोप एल्विश यादव याच्यावर करण्यात आलेत. यानंतर त्याने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत, पण विरोधकांचा हल्लाबोल सुरूच

मुंबई, ५ नोव्हेंबर २०२३ : ललीत पाटील यांच्या ड्रग्स प्रकरणानंतर आता एल्विश यादववरून राज्यात नवा वाद सुरू झालाय. रेव्ह पार्टीचं आयोजन करून या पार्टीत सापांचं विष ड्रग्ज उपलब्ध करून दिल्याचा एल्विश यादववर आरोप आहेत. युट्यूबर अशी ओळख असलेला हा एल्विश गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आला होता आणि त्याच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली होती. यावरून विरोधकांनी चांगलीच टीका केली. बिगबॉस आणि लहान मोठ्या कार्यक्रमातून एल्विश यादवला प्रसिद्धी मिळाली. मात्र त्यांच्यावर रेव्ह पार्टीत सापाचं विष म्हणजे ड्रग्ज पुरवल्याचे आरोप करण्यात आलेत. यानंतर त्याने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील जोरदार टीकास्त्र सोडलं तर याला शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारेंनी प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Nov 05, 2023 09:21 AM