गांधी यांच्यानंतर संभाजी भिडे यांचं नवं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘भारतासाठी नेहरुंचं योगदान…’
VIDEO | महात्मा गांधी यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजी भिडे यांचं बरळणं सुरूच, आता कोणतं नवं विधान
मुंबई, 30 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. भिडे यांच्या या विधानावर सर्वसामान्यांमधूम संतापाची भावना व्यक्त होत आहे. तर काँग्रेसने भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केले, भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान ताजं असताना आणखी एका वादग्रस्त विधानाची त्यात भर पडलीआहे. महात्मा गांधी यांच्यानंतर भिडे यांनी थेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे. ‘नेहरुंचं भारतावर थोडंही प्रेम नव्हतं. कोणतंही कर्तृत्व नसताना नेहरू पंतप्रधान झाले.नेहरूंचं भारतासाठी नखाएवढंही योगदान नाही. त्यांनी चीनसोबत केलेला पंचशील करार भारताला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने आपला पराभव केला आणि ईशान्येकडील भूभाग गिळंकृत केला. हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत’, असं वक्तव्य यवतमाळमध्ये झालेल्या व्याख्यानात संभाजी भिडे यांनी केले आहे.