विधानसभेची निवडणूक आरक्षणाच्या मुद्यावर होणार? जरांगे, हाकेंनंतर आता आंबेडकरही मैदानात
मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके यांच्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक आरक्षणाच्या मुद्यावर गाजण्याची चिन्ह आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का नको म्हणत प्रकाश आंबेडकर देखील मैदानात उतरलेत.
ओबीसी आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकरांनीही आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके यांच्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक आरक्षणाच्या मुद्यावर गाजण्याची चिन्ह आहेत. ओबीसींच्या आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली. मुंबईतील चैत्यभूमीपासून या यात्रेला सुरूवात झाली असून ७ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको म्हणत लक्ष्मण हाकेंची आरक्षण बचाव यात्रा सुरूये तर ओबीसी आरक्षणाला धक्का नको म्हणत प्रकाश आंबेडकर देखील मैदानात उतरलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 26, 2024 11:13 AM