दंगली घडवणार? सरकारमधील मंत्र्यांना संजय राऊतांचा सवाल, मनोज जरांगे पाटील यांना सरकारमधूनच विरोध
tv9 Marathi Special Report | सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. मात्र यांच्या मागणीला सरकारमधील दोन मंत्र्यांनीच कडाडून विरोध केलाय. ओबीसी महासंघापाठोपाठ सरकारमधील मराठा नेत्यांकडून उघडपणे विरोध दर्शवला जातोय.
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | ओबीसी महासंघापाठोपाठ सरकारकडून मराठा नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना उघडपणे विरोध दर्शवला जातोय. त्यामध्ये रामदास कदम आणि नारायण राणे यांचा समावेश आहे. यांनी कोकणी मराठे कुणबीचे दाखले घेणार नसल्याचे म्हटलंय. तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर ज्यापद्धतीने टीका होतेय त्यावरून दंगलीचा डाव आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. सरसकट मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. मात्र यांच्या मागणीला सरकारमधील दोन मंत्र्यांनीच कडाडून विरोध केलाय. आधी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलले नंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचाही सारखाच सूर होता. त्यामुळे दिवाळीआधी दंगली घडवायच्या आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. पुढे राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबतीत छगन भुजबळ यांचं मत वेगळं आहे. जे स्वतःला मराठा समजतात असे शिंदे गटातील काही नेते आहेत, ते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक वक्तव्य करताय अशा काही वक्तव्यांमुळे राज्यात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीये.