मराठ्यांनंतर सदावर्ते यांचा धनगर आरक्षणाला विरोध? सदावर्ते फडणवीस यांचे दिवाण? कुणाची टीका?
tv9 Marathi Special Report : २०१४ मध्ये झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण मंजूर करण्याची हमी फडणवीस यांनी दिली होती. मात्र अद्याप त्यांनी एसटीतून आरक्षण मिळालेलं नाही. बघा काय दिलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना काय दिलं होतं आश्वासन?
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३ | मराठा समाजातील आरक्षणाच्या विरोधानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केलाय. मराठा आरक्षणावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी सरसकट कोणत्याही जातीचा प्रवर्ग बदलता येत नाही, हे सांगताना धनगर धनगड या शब्दांचं उदाहरण त्यांनी दिलं. तर कोळी समाजाला असलेल्या एसटी प्रमाणपत्राचा दाखला दिला. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी दिवाण म्हणून नेमलंय का असा सवाल अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय. तसंच धनगरांना आरक्षण देण्याची ग्वाही देणाऱ्या भाजपनं यावर स्पष्टीकरण करण्याचं आव्हन केलंय. तर २०१४ मध्ये झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण मंजूर करण्याची हमी फडणवीस यांनी दिली होती. मात्र अद्याप त्यांनी एसटीतून आरक्षण मिळालेलं नाही. बघा काय दिलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना काय दिलं होतं आश्वासन?