Special Report | बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून राणे V/s सेना!
शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. त्यावरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मुंबई : शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. त्यावरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो. शिवसेनेकडे आहेत कुठे? आमच्याकडे मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. (After purification of Balasaheb’s memorial, Narayan Rane retaliated against Shiv Sena)
नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला. ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचं मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असं म्हटलं पण आम्ही गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. मी जर त्यांचा पुत्र असतो तर येऊच दिलं नसतं. आणि शुद्धीकरण करायला ब्राह्मण लागतात ते कुठे होते? आम्हाला सांगा आमच्याकडे ब्राह्मण आहेत, आम्ही दिले असते, असा हल्लाबोल राणे यांनी केला.
आधी स्मारकाची स्थिती पाहा
फक्ता गोमूत्रं आणि गोमूत्रं या एकाच विषयासाठी आलो आहोत का? मला कुणाला नमस्कार करावा वाटतो, कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. ते गोमूत्रं ज्यांना शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध आहे. ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा. काय दुषित झालं होतं. एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहेत. तिथे जाऊ शकत नाही. पँटवर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करा. मग कारभार करा, असं ते म्हणाले.
दोनशे रुपये देऊन माणसं आली
राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो. तिथे कुणीही नव्हते. उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे. पाच सहा जणांना दोनशे दोनशे रूपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. तिथे ब्राह्मण हवा होता शुद्धीकरणासाठी आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही घेऊन गेलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना लाचारी करतेय
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बैठक होणार आहे. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. बैठकीबद्दल ऐकून आनंद वाटला. मी 39 वर्षे शिवसेनाप्रमुखांसोबत होतो. त्यांची विचारधारा हिंदुत्वाची होती. त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी सर्वकाही केलं. त्यांनी सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाचा त्याग केला नाही. आताची शिवसेना लाचारी करत आहे. त्याचा एक भाग म्हणून आजची बैठक होत आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.
संबंधित बातम्या:
बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं; राणेंचा हल्लाबोल
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर नारायण राणेंनी काय आशीर्वाद मागितला?; राणेंनी केला मोठा खुलासा
(After purification of Balasaheb’s memorial, Narayan Rane retaliated against Shiv Sena)