महायुतीच्या प्रचारात आता राज ठाकरे, सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकात झळकला फोटो

| Updated on: Apr 12, 2024 | 12:18 PM

महायुतीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकात राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार राज ठाकरे करताना दिसणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची मोठी घोषणा केली. महायुतीला राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकात राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, मला काही अपेक्षा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे’, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेतून केलं होतं.

Published on: Apr 12, 2024 12:18 PM
तर माझी तक्रार करू नका, नितेश राणे यांचा सरपंचांना काय भरला सज्जड दम?
राज्यात दोन नकली आणि एक अर्धा उरलेला पक्ष, अमित शाह यांचा ठाकरे-शरद पवारांवर निशाणा