सरपंचाची पळवापळवी होऊ नये म्हणून भाजपनं कुठं अन् काय लढवली अनोखी शक्कल?
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच निवडून आल्यानंतर सरपंचाची पळवा-पळवी होत असते. त्यामुळे भाजपकडून विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. कोणत्याही प्रकारे सरपंचाची पळवापळवी होऊ नये म्हणून भाजपने नागपुरात उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर, ६ नोव्हेंबर २०२३ | राज्यभरात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहे. दरम्यान, नागपुरात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच निवडून आल्यानंतर सरपंचाची पळवा-पळवी होत असते. त्यामुळे भाजपकडून विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. कोणत्याही प्रकारे सरपंचाची पळवापळवी होऊ नये म्हणून भाजपने नागपुरात उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतल्याचे पाहायला मिळाले. या प्रतिज्ञापत्रावर भारतीय जनता पार्टी नागपूर ग्रामीण असा उल्लेख करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर मी भाजप समर्थित उमेदवार आहे, अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र भरून भाजपकडून भरून घेण्यात आले होते. तर त्यावर त्यांची स्वाक्षरी देखील करण्यात आली होती. अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र १०० पेक्षा जास्त उमेदवारांकडून भरून घेतले होते. भाजपच्या वतीने १०० पेक्षा जास्त सरपंच निवडून आल्याचा दावाही करण्यात आला आहे.