ठाकरेंच्या मेहुण्यांनंतर प्रताप सरनाईकांना ईडीचा दणका
श्रीधर पाटणकर यांच्यानंतर आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर दोन दिवसातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या दोन माणसांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
श्रीधर पाटणकर यांच्यानंतर आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर दोन दिवसातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या दोन माणसांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर प्रताप सरनाईक यांचे ठाण्यातील दोन प्लॅट आणि जमिनींसह 11 कोटी 35 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये राहत्या घराचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सरनाईक यांची मीरारोडची 250 मीटरची जमीनही ताब्यात घेण्यात आली आहे. या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ईडीकडून कारवाई करण्यात आली असली तरी त्यांनी सहकार्य करणारच आहे मात्र याविरोधात मी तीस दिवसाच्या आत न्यायालयात अपिल करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.