देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर युवक काँग्रेसचं मटका फोड आंदोलन, काय आहे कारण?
VIDEO | विस्कळीत पाणी पुरवठ्याविरोधात युवक काँग्रेसचं मटका फोड आंदोलन, कुठं झालं अनोखं आंदोलन?
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केल. फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्याविरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने मटका फोड आंदोलन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या ढिसाळ नियोजनाविरोधात युवक काँग्रेस आक्रमक होत युवक काँग्रेसच्यावतीने हे अनोखं आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सोलापूर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मटका फोड आंदोलन करत युवक काँग्रेसने निदर्शने केलीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या बाबतीत कोणतीही महत्त्वाची भूमिका न घेता नवीन इमारतीच्या उद्घाटनात व्यस्त असल्याने हा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एका आठवड्यात पालिकेने सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. तर सोलापूरकर पाणी प्रश्नावर चिंतेत असताना उपमुख्यमंत्री नूतन इमारतीच्या उद्घाटनात व्यस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.