देशाच्या राजकारणातील मोठी बातमी ! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, काय कारण?
VIDEO | सूरत कोर्टाकडून राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा अन् १५ हजारांचा दंड, त्यानंतर सदस्यत्व रद्द
नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्याबाबतची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनवाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला, तसेच राहुल गांधींना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला असून यासंदर्भातील नोटिफिकेशन्स सचिवालयाने काढले आहे. राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019मध्ये कर्नाटकाच्या कोलार येथे प्रचंड जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. ही टीका करणं राहुल गांधी यांचा चांगलंच भोवलं आहे.