मंत्रिपदाची मस्ती…मनोज जरांगे पाटलांचा मंत्री गिरीश महाजनांना धमकी वजा इशारा काय?
मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या मागणीचं नेमकं काय होणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. कारण सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात झाली आहे. पण त्याआधी लातूरच्या रॅलीतून मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना धमकी वजा इशारा दिल्याचे पाहायला मिळाले.
नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्यानंतर लातूरमधून मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. जामनेरमध्ये मराठा आणि कुणबींची १ लाख ३६ हजार मतं आहेत. असा इशारा जरांगेंनी महाजन यांना दिला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या मागणीचं नेमकं काय होणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. कारण सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात झाली आहे. पण त्याआधी लातूरच्या रॅलीतून मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना धमकी वजा इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. तर गुरूवारी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची रॅली आहे. यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परवानगी रद्द केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. पण तरीही रॅली करूनच दाखवणार असं चॅलेंज जरांगे पाटील यांनी दिलंय. तसंच धनंजय मुंडे जातीय वाद करताय असा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केलाय.