दहा वर्षांनंतर शरद पवार यांची भेट अन् शहाजी बापू पाटील भारावले…
VIDEO | तब्बल दहा वर्षानंतर शहाजी बापू पाटील हे शरद पवार यांना भेटले, पवारांवर बोलताना शहाजी बापू भारावले अन् म्हणाले....
पंढरपूर : सांगोला महाविद्यालयाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांचा सत्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यासाठी शहाजी बापू पाटील उपस्थित होते. तब्बल दहा वर्षानंतर शहाजी बापू पाटील हे शरद पवार यांना भेटले. यावेळी दोघेही स्टेजवर आजूबाजूलाच बसले होते. दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. शरद पवार शहाजी बापूंना काही तरी सांगताना दिसत होते. या भेटीवर शहाजी बापू यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. शहाजी बापू म्हणाले, शरद पवार आणि माझे भावनिक नाते आहे. साहेबांच्या मागे फिरून माझ्या टाचेचं कातडं निघालं. आज साहेबांना भेटलो. आपण भावनिक झालो. दहा वर्षाने आमची भेट झाली. पवार साहेबांच्या भेटीने ऊर्जा मिळते. जिद्द निर्माण होते. सांगोला जनता आणि पांडुरंगाच्या कृपेने पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो…अशी प्रार्थना करतो, असंही म्हटले. तर राज्यात स्फोट होणार असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत चार महिने झाले असचं म्हणतं आहे. रोज सकाळी तेच बोलत असतात. एकदा ते जोरदार आपटतील. तेव्हा त्यांना कळेल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.