देशातील महानगरं विषारी प्रदूषणाच्या विळख्यात, मुंबई आणि पुण्याची हवा किती दुषित?
दिल्लीमधील प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. प्रदूषणामुळे आपली शहरं गॅस चेंबर बनत चालली आहेत. मुंबईचा एअर क्वालिटी इन्डेक्स १७० च्यावर गेलाय तर दिल्लीत श्वास घेणं सुद्धा आजारांना निमंत्रण देण्यासारखं बनलंय. मुंबईतील एअर क्वालिटी इन्डेक्स १७० च्यावर गेलाय
मुंबई, १० नोव्हेंबर २०२३ | राजधानी दिल्लीनंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील हवाही खराब होतेय. दिल्लीमधील प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. प्रदूषणामुळे आपली शहरं गॅस चेंबर बनत चालली आहेत. मुंबईचा एअर क्वालिटी इन्डेक्स १७० च्यावर गेलाय तर दिल्लीत श्वास घेणं सुद्धा आजारांना निमंत्रण देण्यासारखं बनलंय. मुंबईतील एअर क्वालिटी इन्डेक्स १७० च्यावर गेलाय म्हणजे मुंबईची हवा ही अपायकारक बनली आहे. यासह पुण्यातील एअर क्वालिटी इन्डेक्स ११० इतकं होतं. म्हणजेच पुण्यातील हवाही अपायकारक असल्याचे समोर आले आहे. तर दिल्ली आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता दिल्लीची एअर क्वालिटी इन्डेक्स ४२१ इतकी आहे. त्यामुळे दिल्लीतील हवा ही घातक श्रेणीमध्ये आहे. अशा हवेत श्वास घेणं म्हणजे २५ ते ३० सिगारेट पिण्याइतंक हानिकारक असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे.