राणा दाम्पत्यांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल, पती-पत्नीनं घेतली त्यांच्या मुलाची भेट अन्….
१७ रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाली का? असा सवाल करत आनंद अडसूळ यांनी राणा दाम्पत्याची अक्कल काढली. त्या पती-पत्नीस अक्कल आहे की नाही, हा माझा प्रश्न आहे. त्यांना नैतिकता नाहीच, पण अक्कल नाही... टीकेनंतर राणा दाम्पत्य आनंद अडसूळांचा मुलगा अभिजित अडसूळ यांच्या भेटीसाठी गेलेत.
राजकारण सोडले पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही. त्यांना अक्कल नाही. १७ रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाली का? असा सवाल करत आनंद अडसूळ यांनी राणा दाम्पत्याची अक्कल काढली. त्या पती-पत्नीस अक्कल आहे की नाही, हा माझा प्रश्न आहे. त्यांना नैतिकता नाहीच, पण अक्कल नाही. या मंडळींनी अटापिटा करुन मला थांबले आणि तिला उमेदवारी दिली. आता त्यांची हवा नाही म्हणताय तर मग उमेदवारी दिली कशासाठी? असा सवाल करत आनंद अडसूळ यांनी हल्लाबोल केला. यानंतर राणा दाम्पत्यांनी आनंद अडसूळांचा मुलगा अभिजित अडसूळ यांच्या भेटीसाठी गेलेत. राम नवमीच्या निमित्ताने ते अभिजीत अडसूळ यांना भेटले. त्यानंतर अभिजीत अडसूळ यांनी प्रतिक्रिया देत तडजोड करण्याची तयारी दाखवल्याचे पाहायला मिळाले. ‘राम नवमीनिमित्त राणा दाम्पत्य मला भेटायला आले. त्यांचे स्वागत आणि आपल्या परंपरेनुसार आम्ही आदरतिथ्य केले. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू अन् कायमचा मित्र नसतो.’, असे अभिजित अडसूळ म्हणाले.